Friday, January 21, 2022

कोरोनाची लागण झाल्याची शंका आहे तर सगळ्यात आधी हे काम करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असतील किंवा आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय येत असेल, तर आपण ताबडतोब काही उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही वेळीच या सगळ्याचा सामना करु शकता.

सर्वप्रथम, जर तुम्हाला थोडीशीही शंका असेल की तुम्ही कोरोनाच्या विळख्यात आला आहात, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे. जेणेकरून या संसर्गाची वेळीच तपासणी करता येईल. कोरोनाची अचूक ओळख होण्यासाठी त्याची चाचणी होणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, ताबडतोब स्वत:ला अलग करा. कारण कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य विषाणू आहे. असे मानले जाते की, जर बाधित व्यक्ती तोंडावर रुमाल न ठेवता शिंकत असेल तर त्याचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल.

जर तुम्हाला संसर्ग झाला असेल तर तुम्ही ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून अजिबात लपवू नये. कारण असे केल्याने तुमच्या संपर्कात आलेले लोकही अडचणीत येऊ शकतात. त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला द्या. बर्‍याच वेळा,

बहुतेक प्रकरणांमध्ये, कोरोना संक्रमित व्यक्तीला ताप, खोकला, थकवा आणि घसा खवखवण्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत ही लक्षणे अनेक प्रकरणांमध्ये वाढतात. वेळीच काळजी घेऊन ही लक्षणे नियंत्रित करता येतात.

जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल, तर अशा परिस्थितीत अजिबात काम करू नका. कारण अशा संसर्गामुळे तुमच्या शरीरात अशक्तपणा येईल, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी लागेल. तसेच अधिकाधिक हिरव्या भाज्यांचे सेवन करावे लागेल. हे तुमच्या शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करेल.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!