नेवासा
नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे शेतामध्ये काम करीत असलेल्या शेतकर्याच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज बुधवार दि.26 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिस पाटील अनिल माकोणे यांनी दिली.
रावसाहेब भागाजी बोरूडे असे या शेतकर्याचे नाव आहे. सायंकाळी पाच-साडे पाच वाजेच्या सुमारास जोरदार वार्यासह ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला अंमळनेर येथे सुरुवात झाली. याच वेळी या शेतकर्यावर दुर्देवी प्रसंग ओढावला.
नेवासा फाटा येथिल ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेला आहे. मागिल आठवड्यात ही चक्री वादळामुळे अंमळनेर व करजगावमध्ये मोठे नुकसान झाले होते.