Saturday, July 2, 2022

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार

असल्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असल्याचाही

अंदाज देखील हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. तसेच थंडी आणखी वाढणार असल्याचं सुक्धा बोललं जात आहे.मुंबईत रविवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तसेच पुण्यात

कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. याबरोबरच, नागपूरमध्ये कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. तर याआधी तापमानात कमालीची घट होत, पारा घसरला होता.

मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो.

मात्र, फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून राज्यातील थंडीचा जोर कमी होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!