माय महाराष्ट्र न्यूज:जवळपास दोन वर्षांपासून कोविड 19 निर्बंधांशी आणि कोरोना महामारीशी संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्रातील रेस्टॉरंट आणि बार चालकांना आणखी एक धक्का बसला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील
वार्षिक उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित विभागाने सर्व बारवरील वार्षिक उत्पादन शुल्क 15 टक्क्यांनी वाढवले आहे. वाईन शॉप्सच्या शुल्कात ७० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
28 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या गॅझेट अधिसूचनेच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात सुमारे 20,000 बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. आता या सर्वांना अधिक शुल्क मोजावे लागणार आहे.
या वाढीनंतर आता बारचे वार्षिक शुल्क ६.९३ लाख रुपयांवरून ७.९७ लाख रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर दारूच्या दुकानांवरील हे शुल्क वार्षिक १५ लाखांवरून २१ लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीला सामोरे जाण्यासाठी बार आणि रेस्टॉरंट मालकांनी 50 टक्के सूट देण्याची विनंती करण्याच्या पार्श्वभूमीवर ही वाढ झाली आहे.
दरम्यान राज्य सरकारने 2020-21 साठी 15 टक्के दरवाढ मागे घेतली आहे आणि 2020-21 साठी परवाना शुल्क भरण्यासाठी 50 टक्के सवलत दिली आहे. असे सांगत या शुल्कवाढीचे समर्थन केले आहे.
कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सरकारने 2021-22 साठी परवाना शुल्कात वाढ केलेली नाही. सरकारने उद्योगांच्या मागण्यांचा विचार केला आहे. एकूणच, सरकारने 2020-21 आणि 2021-22 मध्ये रेस्टॉरंट आणि बारला परवाना शुल्कात 33 टक्के सवलत दिली आहे.