भेंडा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. रामकिसन सासवडे यांची नुकतीच महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे संयुक्त समितीने निवड केली आहे.
डॉ.सासवडे हे याच महाविद्यालयात 28 वर्षांपासून वनस्पती शास्त्र विषयाचे विभाग प्रमुख,उपप्राचार्य,शिक्षण संस्थचे समन्वयकपदी कार्यरत आहेत.
मागील दोन वर्षापासून प्रभारी प्राचार्य पद अतिशय सक्षम पद्धतीने सांभाळलेले आहे.
त्यांनी यापूर्वी पुणे विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळ, विज्ञान विद्या शाखा सदस्य तसेच अभ्यासक्रम उप समितीचे अध्यक्षपद भूषविलेले असून विद्यापीठाच्या अनेक समितीवर काम केलेले आहे. वनस्पती शास्त्र विषयाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडीचे ते मार्गदर्शक असुन त्यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संशोधन करत आहेत. त्यांचे आता पर्यंत 45 शोध निबंध राष्ट्रीय तसेच ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मलेशिया, थायलंड, अंदमान निकोबार बेटे येथे प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करून प्रसिद्ध झालेले आहेत.
त्यांना उत्तर भारतीय गुजराती समाज तर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, वनस्पती शास्त्रतील इंडियन अकॅडमी ऑफ प्लांट सायन्स,मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश कडून फेलोशिप प्राप्त झालेली आहे. वनस्पती शास्त्र विषयात उत्कृष्ट संशोधना मुळे ओरिसातील जगन्नाथपुरी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले आहे. जिजामाता महाविद्यालयात प्राचार्य म्हणून निवड झाल्याने परिसरातून आनंद व्यक्त होत असून त्या बद्दल संस्थचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील,विश्वस्त माजी आ. पांडुरंग अभंग, अड.देसाई देशमुख,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.राजश्रीताई घुले पाटील,डॉ.क्षितिज घुले पाटील व सर्व विस्वस्थ मंडळ, संस्थेचे स
चिव अनिल शेवाळे, रवींद्र मोटे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.