नेवासा
नेवासा शहरातील जिल्हा परिषद शाळेत नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान केंद्र असल्याने उद्या रविवार दि.30 एप्रिल रोजीचा नेवासा शहरातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहेत.
आपल्या देशात उपविभागीय अधिकारी म्हटले आहे की,
मुख्याधिकारी, नेवासा नगरपंचायत, नेवासा, नेवासा खुर्द यांचेकडील पत्रां अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती, नेवासा, ता. नेवासा, जि. अहमदनगर या संस्थेची संचालक निवडणूक सन 2023 ते 2028 करीता दि. 30/04/2023 रोजी सकाळी 8.00 ते 4.00 या वेळेत मतदान होणार आहे. परंतु सदर दिवशी नेवासा शहराचा आठवडे बाजार ही असून त्यामुळे मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. वरील गोष्टीचा विचार करता रविवार दि. 30/04/2023 रोजीचा नेवासा शहरातील आठवडे बाजार बंद ठेवणेकामी आदेश होणेबाबत विनंती केलेली आहे.
निवडणुक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, नेवासा तथा सहाय्यक निबंधक सहाकरी संस्था, नेवासा यांनी कळविलेनुसार बाजार समितीचे संचालक मंडळ निवडणुक प्रक्रिया सुरु असुन दि. 30/04/2023 रोजी सकाळी 8.00 ते 4.00 या वेळेत मतदान होणार आहे. बाजार समितीचे निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सोसायटी मतदार संघात 1679 ग्रामपंचायत मतदार संघात 1152 आणि व्यापारी मतदार संघात 407 मतदान होणार आहे. संपुर्ण नेवासा तालुक्यातील मतदान नेवासा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा खु. आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा नेवासा खु. मु.पो.नेवासा खुर्द पत्ता पंचायत समिती कार्यालयाजवळ नेवासा येथे एकाच ठिकाणी एकुण दहा मतदान खोल्या / बुध वर होणार आहे. त्यामुळे मतदान होण्याच्या दिवशी वाहनांची आणि मतदारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याच परिसरात शाळेलगत आठवडे बाजार रविवार दि. 30/04/2023 रोजी होणार असल्याने मतदानासाठी येणारे मतदार आणि आठवडे बाजार यामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील बाबींचा विचार करता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणेसाठी दि. 30/04/2023 रोजी नेवासा शहरात भरणा-या आठवडे बाजाराबाबत उचित नियोजन होणेबाबत विनंती केलेली आहे.
त्यामुळे मतदान होण्याच्या दिवशी वाहनांची आणि मतदारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याच परिसरात शाळेलगत आठवडे बाजार रविवार दि. 30/04/2023 रोजी होणार असल्याने मतदानासाठी येणारे मतदार आणि आठवडेबाजार यामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील बाबींचा विचार करता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणेसाठी दि. 30/04/2023 रोजी नेवासा शहरात भरणा-या आठवडे बाजार बंद ठेवण्यात येत आहे.