Friday, July 1, 2022

करुणा शर्मा यांचं खळबळजनक विधान :तर सर्वात आधी धनंजय मुंडे जेलमध्ये असते

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करुणा शर्मा यांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. सोमवारी कोल्हापुरात बोलताना करुणा शर्मा यांनी आपला शिवशक्ती पक्ष आता

कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोटनिवडणूक लढणवार असल्याचं जाहीर केलं. तसंच लोकसभा, विधानसभा ते नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये

पक्षाचे उमेदवार असतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अपेक्षित उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं करुणा शर्मांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.जिथे जिथे पोटनिवडणूक असेल तिथे आमच्या पक्षाचा उमेदवार उभा करु. कोल्हापूरमध्ये दोन-तीन

लोकांशी आमचं बोलणं सुरु असून यामध्ये उत्तम कागले, अजय देढे या सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच इतर दोन जण राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या नावाची घोषणा नंतर करण्यात येईल,” अशी माहिती करुणा शर्मा यांनी दिली.

दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना करुणा शर्मा यांनी शक्ती कायद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. शक्ती कायदा अंमलात आणला

असता तर धनंजय मुंडे आणि संजय राठोड दोघेही तुरुंगात असते असं करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!