माय महाराष्ट्र न्यूज:राज्य शासनाच्या वाईन विक्रीच्या धोरणाबाबत विरोधी पक्षाचे खासदार म्हणून राजकीय विरोध करणे ठीक आहे. परंतु वाईनचा विषय जर आपणास पटतच नसेल तर आधी आपल्या मालकीचे दारू आणि बियर निर्मितीचे
कारखाने बंद करा मगच तोंड उघडा, असा सल्ला शिवसेनेचे नगर उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी खा.डॉ.सुजय विखे यांना दिला आहे.सहकारी साखर कारखान्यांच्या अवसायनीतून रॉकेट नावाची देशी दारू तयार करता. त्याची चव चाखून
खा. संजय राऊत यांच्यावर टीका करीत असाल तर त्याविषयी बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या
संदर्भामध्ये खा. राऊत यांनी सेनेच्या मुखपत्रातून टीका केली होती.यावर माध्यमांशी बोलताना ते वाईन पिऊन लिहीत असावेत, असे वक्तव्य खा.डॉ.विखे यांनी केले होते. त्यास जाधव यांनी प्रत्युत्तर दिले.