नेवासा
नेवासा तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती निधीतील घोटाळ्याची उच्चस्तरिय सखोल चौकशीच्या मागणीसाठी
नेवासा तालुका आम आदमी पार्टीने
१ मे रोजी नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले.
आप या बाबद आक्रमक भुमिका घेत या घोटाळ्याची उच्चस्तरिय सखोल चौकशीची मागणी मान्य न केल्यास येत्या दि.१ मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता ,मात्र ही मागणी मान्य न झाल्याने आज दि.१ मे रोजी सकाळी ७:३० वाजता महाराष्ट्र स्थापना दिना पासून अड.सादिक शिलेदार,प्रवीण तिरोडकर,संदीप आलवणे,किरण भालेराव नेवासा तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले होते.मात्र तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
तहसीलदार संजय बिरादार यांनी उपोषणकर्त्यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की,नेवासा तालुक्यात नैसर्गिक आपत्ती निधी घोटाळा प्रकरणी नेवासा पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. १४४ / २०२२ प्रमाणे दाखल झालेला असून सदरची बाब ही न्यायप्रविष्ट आहे. तसेच सदर प्रकरणी सखोल चौकशी करणेकामी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडेस लेखापरिक्षण पथक नेमणूक करणेकामी विनंती पत्र देण्यात येणार आहे.