Thursday, June 30, 2022

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार ‘मुळा’च्या इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याने
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या 80 कोटी रुपये खर्चाच्या इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन उद्या शुक्रवारदि.18 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते
व कारखान्याचे संस्थापक जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी दिली.

वर्षाला अडीच कोटी लिटरचे उद्दिष्ट ठेवलेल्या प्रकल्पासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व निकष संभाळून झिरो लिक्विड डिस्चार्ज (झेडएलडी) तत्वावर इव्हॅपोरेटर सभासद यंत्रणा कार्यान्वित केली आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्पादित होणारा स्पेंटवॉश इंधन म्हणून वापरला जाणार आहे. केंद्र सरकारने सन 2025 पर्यंत आठऐवजी 20 टक्के इथेनॉल इंघनात मिश्रण करण्याचे धोरण जाहीर केले. रोज 90 हजार लिटर उत्पादनासाठी सर्व यंत्र, साठवण टाक्या, इमारत व नवीन बॉयलर उभारणी होवून प्रकल्प सुरू झाला आहे.
मंत्री गडाखांच्या मार्गदर्शनाखाली वीज प्रकल्प व यंदाच्या गळीत हंगामात करण्यात आलेली विस्तारवाढ ही यशस्वी झाली.

 

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!