Saturday, July 2, 2022

पतीपासून विभक्त झालेल्या महिलेचं 17 वर्षीय मुलावर जडलं प्रेम : पुढे जे घडले ते वाचून तुम्हाला धक्का बसेल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वासनेच्या आहारी माणूस सारं काही विसरुन जातो आणि वासना क्षमविण्यासाठी कोणतंही पाऊल उचलतो. असाच काहीसा प्रकार हा अकोल्यात घडल्याचं आता समोर आलं आहे.

एका 27 वर्षीय विवाहित महिलेचं एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर प्रेम जडलं. प्रेमाखातर तिने घर देखील सोडलं पण, प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्याने अल्पवयीन मुलावरील प्रेम त्या महिलेला चांगलंच महागात पडलं.

अकोल्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे 27 वर्षीय महिलेने एका अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॉस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन

महिलेला अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण धक्कादायक असंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय महिला ही विवाहित होती. पण तिने आपल्या पतीला सोडलं आहे.
अकोला शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा 31 जानेवारी

2022 रोजी घरातून अचानक रागाच्या भरात निघून गेला होता. त्यामुळे मुलाच्या नातेवाईकांनी खदान पोलिसांत धाव घेतली होती. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत असताना मुलगा अचानक 9 फेब्रुवारी 2022 रोजी घरी परतला.

त्यानंतर खदान पोलिसांकडून कागदोपत्री कारवाई करून मुलाला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. मात्र, या सगळ्यात एक वेगळीच माहिती समोर आली ज्याने पोलिसांना देखील धक्का बसला. जाणून या सगळ्या प्रकरणाविषयी सविस्तरपणे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक 27 वर्षीय विवाहित महिला आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा हे दोघेही एमआयडीसीमधील दालमिलमध्ये काम करायचे. इथे त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले होते.

27 वर्षीय महिला ही विवाहित होती. पण पतीसोबत भांडण झाल्याने ती पतीपासून वेगळी राहत होती. यावेळी ती आपल्या बहिणीच्या 9 वर्षीय मुलीसोबत राहत होती. दरम्यान, आरोपी महिला ही आपल्या भाचीला सोडून अचानक गायब झाली होती.

त्यामुळे 31 जानेवारीपासून घरीच न परतल्याने घरमालकाने एमआयडीसी पोलीस महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. त्यानंतर महिलेच्या 9 वर्षीय भाचीला महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले.

दुसरीकडे पोलिसांना एक 17 वर्षीय मुलगा देखील बेपत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही तक्रारींचा एकमेकांशी काही संबंध आहे का हे देखील पोलिसांनी तपासून पाहिलं.

अखेर 9 फेब्रुवारीला अल्पवयीन मुलगा हा आपल्या घरी परतला. त्यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!