माय महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडत असल्याचं जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी त्यांचं आत्मचरित्र ‘
लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली आणि कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. सभागृहात उपस्थित सर्व नेत्यांनी शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली असताना अजित
पवारांनी मात्र त्यांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांनाही झापलं. यावेळी त्यांनी सुप्रिया तू बोलू नकोस असा सल्लाही दिला. तसंच मोठा भाऊ या अधिकारवाणीने सांगत गोंधळ घालणाऱ्याला गप्प केलं.
मात्र शरद पवार यांच्या या निर्णयाला राज्याचे विरोधी पक्षेनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी समर्थन दिलंय. पवार साहेब त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांना सुनावताना म्हटलं की, साहेबांच्या डोळ्यादेखत अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको? साहेब देशात, महाराष्ट्रात फिरणारच आहेत. त्यांचे मार्गदर्शन
आपल्याला असणारच आहे. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत असं नव्हे. शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे. भावनिक होऊ नका. आपण नव्या अध्यक्षाच्या पाठीशी उभे राहू असं आवाहन अजित पवार यांनी केलं.कुणीही
भावनिक होण्याचं कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता. कालच हे जाहीर करायचं होतं. साहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या मनात जे आहे तेच आपण करू. तुम्ही कुठेही बोलावलं तरी मार्गदर्शन ते करतील. नव्या अध्यक्षाच्या मागे
आपण उभा राहू असं अजित पवार यांनी म्हटलं.तुम्ही गैरसमज करून घेतायत. पवार साहेबांच्या वयाचा विचार करता. साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करून नव्या नेतृत्वाकडे जबाबदारी देण्यात येणार आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष नेतृत्व काम करेल.
आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. पवारांच्या मार्गदर्शनाखालीच नेतृत्व काम करेल. साहेब अध्यक्ष असो किंवा नसो, आपला परिवार पुढे चालत राहणार आहे. भाकरी फिरवायची असते असं ते म्हणाले होते. मी काकींशी बोललो, ते कदापि माघार घेणार नाहीत असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं