माय महाराष्ट्र न्यूज:हवामान खात्याने पुन्हा राज्यात पुढचे पाच दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे .
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात बुधवारी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. या भागातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक
ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. धुळे, नंदुरबार, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.हवामान खात्याने दिलेल्या
अंदाजानुसार 4 आणि 5 मे रोजी मराठवाड्यातील अनेक भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊसाचा अंदाज आहे. तर अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे 6 आणि 7 मे रोजी मराठवाड्यातील काही भागांमध्ये
मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.धुळे, नंदुरबार, पुणे, लातूर या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह वारा आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या भागात पाऊस तर होणारच आहे पण त्यासोबत दिवसा प्रचंड उकाडा
जाणवणार असल्याचे देखील हवामान खात्याने सांगितले आहे. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहान हवामान खात्याने केले आहे.