माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचं अर्थसंपल्पीय अधिवेशन सुरु आहे.काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. ते आज हायकमांडची भेट घेणार आहे असे बोले जात आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात हे आज दिल्लीत दाखल झाले आहेत.
ते विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या आमदारांची यादी घेऊन दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्या यादीत काँग्रेसच्या जवळपास चार नेत्यांची नावे आहेत.काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे देखील पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी
दिल्लीला दाखल झाले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे, अशी चर्चा होती. पण आज बाळासाहेब थोरात दिल्लीला घेऊन गेलेल्या यादीत
राज्य काँग्रेसच्या वतीने सूचविण्यात आलेल्या चार नावांमध्ये पृथ्वीराज यांचं नाव नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नाना पटोले हे आक्रमक नेते असल्याने ते पक्षबांधनी
चांगल्याप्रकारे करु शकतील, या विचारातून त्यांच्यावर त्यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती. तेव्हापासून विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी आहे. आता अध्यक्षपदी कोणत्या
नेत्याची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दरम्यान बाळासाहेब थोरात आज दुपारी दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या नावांची यादी घेऊन ते दिल्लीला गेले आहेत. या यादीत जवळपास काँग्रेसच्या चार ज्येष्ठ नेत्यांची नावे आहेत.
त्यामध्ये संग्राम धोपटे, सुरेश वरपुडकर, सुरेश धोटे आणि अमीन पटेल यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.