माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती व दुष्काळी टापुतील 182 गावातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरणाचा प्रस्ताव करण्यात आला आहे.
धरण बांधून झाले त्यात पाणीही साठविले जात आहे.मात्र कालव्यांची कामे रेंगाळल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्यांना शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळाले नसल्याचे वास्तव सत्य आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात बर्यापैकी निधी दिल्यामुळे कालव्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.दरम्यान राज्याच्या अर्थसंकल्पात निळवंडे प्रकल्पासाठी 365 कोटीची भरीव तरतूद
केल्याने निळवंडे कालव्यांच्या अंतिम टप्प्यातील कामांना गती मिळणार असल्याने निळवंडे पाटपाणी कृती समितीने याचे स्वागत केले आहे.चालू वर्षी अर्थसंकल्पात आघाडी सरकारने प्रकल्पासाठी 365 कोटीच्या भरीव निधीची तरतुद केल्याची माहीती
निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके यांनी दिली. या निधीमुळे निळवंडे धरणाच्या मुख्य कालव्यांच्या अंतिम टप्प्यातील कामांना वेग येणार आहे.निळवंडेसाठी आघाडी सरकारने भरीव
तरतूद केल्याने निळवंडे पाटपाणी कृती समितीचे सचिव उत्तमराव घोरपडे, विठ्ठल घोरपडे, सौरभ शेळके, सर्जेराव घोरपडे, प्रभाकर गायकवाड, शिवाजी शेळके, दत्ता भालेराव, सुखलाल गांगवे, राजु सोनवने,
रावसाहेब कोल्हे, विलास गुळवे सह समितीचे सदस्य व लाभधारक शेतकर्यांनी स्वागत केले आहे.