Wednesday, May 25, 2022

महाराष्ट्रातील या भाजपाच्या दिग्गज नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला हा आरोप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात आम आदमी पार्टीने दरेकर यांच्याविरोधात तक्रार केली होती. मुंबई जिल्हा

मध्यवर्ती बँकेत बोगस मजूर असल्याचे व मुंबई बँक आणि ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आला. या प्रकरणी IPC कलम 199,200,406,417,420,465,468, आणि 120(b) कायद्यांतर्गत प्रवीण दरेकर

यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं की, हे सगळं सूडभावनेनं केलं जात आहे. विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर टीका करत असल्यानं हा गुन्हा दाखल केला जात आहे. याआधी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात होते.

गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. सभागृहात याबाबत मी सांगणार आहे. अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला गेला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून एसएमएस पाठवले गेले असा आऱोप दरेकरांनी केला.

दबाव आणून आणि षडयंत्र रचून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमचा आवाज दाबण्यासाठी असं केलं जात आहे. अतिरिक्त आयुक्तांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न केले गेले. असं होत नाही हे सांगूनही शेवटी त्यांच्यावर इतका दबाव

टाकला गेला की गुन्हा दाखल कऱण्यात आल्याचं दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात बोलताना दरेकरांना अडकवण्यात येईल अशी भीती व्यक्त केली होती. त्यानतंर दुसऱ्याच दिवशी गुन्हा दाखल झाल्यानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना

याबाबत माहिती होती का असा प्रश्न विचारला जात आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे अध्यक्ष होते. २०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांनी २००० कोटींचा आर्थिक घोटाळा

केल्याचा आरोप आपने केला आहे. तसंच नियमांचे उल्लंघन करत काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला असून तो अहवाल आपण देण्यास तयार असल्याचंही म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!