Sunday, June 4, 2023

माळीचिंचोरा फाटा परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

नेवासा/प्रतिनिधी

तालुक्यातील माळीचिंचोरा फाटा  शिवारात नेवासा पोलिसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद केला आहे.

याबाबद पो कॉ. शाम बाबासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यदित म्हंटले आहे की,अधिक माहिती अशी की, दि.२२ मे रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,तालुक्यातील माळीचिंचोरा फाटा येथे ईसम नामे आकाश संजय पवार हा बेकायदेशीर गावठी कट्टा व काडतूसे जवळ बाळगुन फिरत आहे, अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांचे आदेशाने पोलीस स्टेशन नेवासा येथे नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस कॉ. सुमित करंजकर, पोलीस कॉ. शाम गुंजाळ, पोलीस कॉ. गणेश ईथापे व दोन पंच असे सर्वजण नेवासा पोलिस स्टेशन येथून खाजगी वाहनाने रवाना होवुन मिळालेल्या गुप्त बातमीनुसार माळीचिंचोरा फाटा येथे वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावुन थांबले असता, एक इसम संशयीत रित्या माळीचिंचोरा फाटा येथे फिरत असताना दिसल्याने सांयकाली ठिक ७ वाजण्याच्या सुमारास सदर ईसमाजवळ जावून त्याला आम्ही सर्वांनी घेराव घालून पोलीसांनी त्याला हटकले असता, त्याला पोलीस आल्याचा संशय आल्याने त्याने त्याच्या जवळ असलेला उजव्या कमरेला लावलेला गावठी कट्टा दाखवुन तो पोलीसांना भिती दाखवु लागला, त्याच दरम्याण फिर्यादी पोकॉ शाम गुंजाळ
व पोकॉ गणेश ईथापे असे दोघांनी त्याच्या अंगावर झडप घालून त्याला पकडुन ताब्यात घेतले त्यादरम्यान त्याला त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव आकाश संजय पवार (वय 23 वर्षे) रा. ब्रम्हतळे, ब्रम्हनगर नागरदेवळे, भिंगार ता. जि. अहमदनगर असे सांगितले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या अंगझडती मध्ये त्याच्या उजव्या हातामध्ये असलेला गावठी कट्टा (पिस्टल) व पँटच्या डाव्या खिशामध्ये सहा जिवंत काडतुसे, एक मोबाईल व त्याची वापरती एक मोटारसायकल असा मुद्देमाल मिळुन आलेला आहे..

त्यानंतर सदर इसमास ताब्यांत घेवुन पोलीस स्टेशन नेवासा येथे आणुन त्याच्याविरुध्द पोकॉ शाम बाबासाहेब गुंजाळ,नेमणुक पोलीस स्टेशन नेवासा यांनी सदर ईसमाविरुध्द फिर्याद दिल्याने त्यावरुन पोलीस ठाणे नेवासा येथे गु.र.नं 556 2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/27 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करीत असून ताब्यात घेतलेला इसम नामे आकाश संजय पवार रा. भिंगार ता. जि. अहमदनगर यांस सदर गुन्ह्यांत अटक केलेली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल,मपोना सविता उंदरे, पोकॉ सुमित करंजकर, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ गणेश ईथापे यांनी सदरची कारवाई केली असुन पुढील तपास उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करीत आहेत.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!