माय महाराष्ट्र न्यूज:महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. थोरात यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
महाराष्ट्रातील राजकारण, राज्यपालांची विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भातली भूमिका, भाजपनं (BJP) विधानसभा अध्यक्षपदावरुन न्यायालयात घेतलेली धाव आणि काँग्रेसच्या पक्ष नेतृत्त्वासंदर्भात सुरु असलेल्या चर्चा यावर थोरात यांनी भाष्य केलं.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी
भाजपकडून त्यांसंदर्भात चुकीचं राजकारण सुरु असल्याचं म्हटलंय. तर, सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेसंदर्भातील याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिल्याची माहिती देखील थोरात यांनी दिली.
विधानसभा अध्यक्ष पद तातडीने भरलं जावं, असं कोर्टाने सांगितले आहे.आम्ही राज्यपालांना विनंती करत आहोत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणाऱ्या गिरीश महाजन यांच्या
डिपॉझिटची रक्कमही जप्त केली गेली होती. आता, गिरीश महाजन यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
भाजपकडून सध्या चुकीचं राजकारण सुरु आहे. अध्यक्ष निवडावा हे राज्यघटना सांगते असे थोरात म्हणाले.