माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.यामुळे काहीना आपला जीव ही गमवावा लागला आहे.अशीच एक घटना समोर आली आहे.
जिल्ह्यातील नगर जामखेड रोडवरील निंबोडी परिसरात झालेल्या अपघातात पारनेर तालुक्यातील दोघांचा मूत्यू झाल्याची घटना घडली आहे.सागर बबन लष्करे वय २२ रा. गोरेगाव ता. पारनेर व किरण बाबासाहेब ठुबे
वय २५ रा. कान्हूर पठार ता. पारनेर असे मयत व्यक्तींची नावे आहेत. नगर जामखेड रोडवरील निंबोडी येथे अपघात झाला. नागरिकांनी जखमींना तत्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच दोघांना घोषित करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात इसमांवर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.