नेवासा/प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी नेवासा शहरात यशवंत स्टडी क्लब नावा रूपाला आले परंतु माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी राजकीय सुडभावनेतून हे स्टडी क्लब बंद पाडण्याचा घाट घातल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील विद्यार्थी, पालक अशा 200 ते 250 आक्रमक झालेल्या विद्यार्थी-पालकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून नेवासा तहसीलदार यांना हा स्पर्धा परीक्षा स्टडी क्लब सुरू राहावा यासाठी निवेदन दिले.
यावेळी यशवंत स्टडी क्लबचे विद्यार्थी गीता अंबाडे, महेश निकम तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश मापारी, नंदकुमार पाटील, सतीश पिंपळे, अल्पेश बोरकर आदींनी भाषण करून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा निषेध नोंदवला.
नेवासा शहरात पंचायत समितीच्या आवारातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भव्य इमारतीमध्ये यशवंत स्टडी क्लब आहे. हेच यशवंत स्टडी क्लब आमदार शंकरराव गडाख यांच्या कल्पनेतून शहरासह परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भवितव्य घडवत असतो.तसेच या स्टडी क्लबच्या माध्यमातून यांचे भवितव्य घडवणाऱ्या देशाच्या सर्वोच्च एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी नेवासा येथे ग्रामीण भागातून अनेक होतकरू व गरीब मुले, मुली यशवंत स्टडी क्लबमध्ये आपल्या गुरूंचे, आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अभ्यासासाठी येत असतात परंतु हाच स्टडी क्लब नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंद पाडण्याचा घाट घातला असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विरजण टाकण्याचा हा त्यांचा किळसवाना प्रकार नेवासा तालुक्यातील जनता कधीही खपवून घेणार नाही. ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले तर यास सर्वस्वी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हेच जबाबदार असतील.
तसेच पंचायत समितीच्या आवारातील सार्वजनिक बांधकाम खात्याची ही इमारत गेल्या चार ते पाच वर्षांपासून धूळ खात पडलेली होती. या इमारतीमध्ये अनेक बेकायदेशीर बाबी, तसेच तेथे घाणीचे साम्राज्य पसरून दुर्गंधीमुळे विवेकानंद कॉलनी परिसरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला तसेच यामुळे त्यांचे आरोग्य ही धोक्यात आले होते.
नेवासा येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कुठेही जागा नव्हती जागेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कुठेही पर्याय शिल्लक नव्हता. त्यानंतर अनेक विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी आमदार शंकरराव गडाख यांची भेट घेऊन त्यांच्याकडून सदरच्या वास्तूची डागडुजी करून , शैक्षणिक साहित्य ,फर्निचर, तार कंपाऊंड ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ञ ,प्राध्यापक वर्ग व कायमस्वरूपी व्यवस्थापक यांची नियुक्ती करून स्टडी क्लब सुरू करावी अशी मागणी केली होती. त्यानुसारच आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्तिगत खर्च करून हा स्टडी क्लब सुरू केला. या स्टडी क्लब मध्ये अभ्यासासाठी एमपीएससी, यूपीएससी साठी लागणारे पुस्तक उपलब्ध करून दिले. यामुळे अनेक विद्यार्थी येथे ग्रामीण भागातून अभ्यास करण्यासाठी येऊ लागले व या स्टडी क्लबचा लाभ घेऊ लागले या स्टडी क्लबमधून नुकतेच नेवासा तालुक्यातील पाच विद्यार्थी यांची मुंबई येथे पोलीस म्हणून नियुक्ती झाली आहे.ही विद्यार्थ्यांमध्ये झालेली प्रगती माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पहावत नाही का असा जनतेमधून त्यांना प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. भविष्यात अनेक विद्यार्थी यामुळे घडणार आहेत या सर्व विद्यार्थ्यांना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अंधारात ढकलण्याचा चंगच बांधला आहे का असे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच हे महाशय मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे स्वतःच्या गावामध्ये एक अंगणवाडी ही काढू शकणार नाही. त्यांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी ,जीवनाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या निषेध मोर्चाच्यावेळी नंदकुमार पाटील,सतीश पिंपळे,लक्ष्मणराव जगताप,महेश मापारी,काकासाहेब गायके,नारायण लोखंडे,निलेश पाटील,असिफ पठाण,सुलेमान मनीयार,राजेंद्र सानप,संदीप बेहळे,बाळासाहेब वाघ,रोहित जोशी,सुनील धायजे,दिनेश व्यव्हारे,गोरक्षनाथ व्यव्हारे,अभय गुगळे,संदीप परदेशी,सुनील साळुंके,प्रवीण सरोदे,पी आर जाधव,अभय गुगळे,सागर गांधी,जितेंद्र कु-हे,निलेश जोशी,संदीप सरकाळे,जालु गवळी,भैय्या कावरे,निलेश जगताप,डॉ योगेश परदेशी,रामकिसन कांगुणे,विशाल सुरडे,सचिन नागपुरे, स्वप्नील मापारी,विनायक नळकांडे,अस्लम मणियार,फारूक आतार,गणेश कोरेकर,जयवंत मापारी
असंख्य नेवासेकर, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.