Tuesday, May 24, 2022

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी मोठी बातमी, यापुढे बदल्या अशा पद्धतीनेच….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदलीच नवीन धोरण राज्य सरकारने मागच्या वर्षी ठरवण्यात आलं होत. त्या अनुषंगाने एक नवीन

अद्ययावत सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी एका कंपनीची नेमणूक करण्यात अली होती.आणि त्या बरोबर एक समितीची नेमणूक देखील करण्यात आली होती. या वर्षी त्या सॉफ्टवेअर अपडेटचे काम सुरू

असून त्याच्यामध्ये शिक्षकांची माहिती येणार आहे आणि ती पारदर्शक असून या सॉफ्टवेअरच्या आधारे यापुढे राज्यातील शिक्षकांची बदली ही ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहे. आता येत्या काळात पुन्हा ऑनलाईन

जिल्हा परिषद शिक्षक बदल्या होतील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 27 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

कोरोनामुळे शिक्षकांचा बदल्या रखडल्या होत्या. शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पुन्हा मार्चपासून राबविण्यात येणार असल्याचं याआधी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितलं होतं.

सॉफ्टवेअर टेंडरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. टेंडरिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन मार्चमध्ये बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या होतील, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली होती. त्यामुळे

आता बदल्या कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.शिक्षकांना सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठेही बसून 24 तासात कधीही त वापर करता येऊ शकतं सरळ आणि पारदर्शक पद्धतीने त्यांना बदलीची प्रक्रिया मध्ये समोर जाता देखील येऊ शकतो.

कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. त्या अनुषंगाने या सॉफ्टवेअर तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहे.’ असं देखील यावेळी आयुष प्रसाद यांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!