अहमदनगर/प्रतिनिधी
एक किलो कांदा उत्पादन करण्यासाठी किमान १० रुपये खर्च होतो आणि १ रुपया किलोने विक्री होणार असेल तर किलो मागे ९ रुपयांचा तोटा शेतकरी सहन करत आहे. त्यामुळे कांद्याला किमान २० रुपये किलो हमीभाव मिळावा अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली आहे.
अधिक माहिती देताना श्री.सूर्यवंशी पुढे म्हणाले की,कांदा सरकार पाडू शकते हे सरकारने विसरू नये. कांद्याच्या गडगडल्या भावामुळे शेतकरी रडत बसला आहे. पण तुम्ही हे का विसरता कांद्याने सरकारे पडली आहेत. शेतकऱ्यांच्या अश्रूचे महत्व राजकर्त्यांना समजत नाही, कारण शेतकरी उत्पादन करतात आणि फुकट भावात विकता .याला एकच उपाय आहे तो म्हणजे कांदा जमिनीत सडवा, त्याचे उत्तम खत होते. बाजारात कांदा आणू नका. एक वर्ष कांदा पिकवू नका हे आंदोलन झाले पाहिजे. एक वर्ष कांदा बाजारात आला नाही तर मग तुमचे महत्व कळेल. खाणारे आणि सरकार कांद्यासाठी रडले पाहिजेत. किमान २० रुपये कांद्याचा हमी भाव मिळालाच पाहिजे याच्या आत विक्री करण्यावर बंदी आणली पाहिजे. ही मागणी सर्व स्तरातून झाली पाहिजे.
एक किलो कांदा उत्पादन करण्यासाठी किमान १० रुपये खर्च होतो आणि १ रुपयाने विक्री होणार असेल तर ९ रुपये किलो मागे शेतकरी तोटा सहन करत आहे. आतबट्याचा धंदा फक्त शेतकरीच करतो. शेतकऱ्यांनो किती दिवस तुम्ही आतबट्याचे धंदे करणार याचा विचार करा. ग्राहक तुमच्या दारात आला पाहिजे असे तुम्हाला का वाटत नाही?
एक वर्ष कांदा लागवड बंद आणि तुमच्याकडे कांदा आहे त्याला २० रुपये किलो भाव मिळाला तर विका अन्यथा जाग्यावर सडवा सरकारला रडवा ही घोषणा घेवून प्रचार करा असे आवाहन श्री.सूर्यवंशी यांनी केले आहे.