माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात केवळ लाल कांदाच विक्रीसाठी येत आहे. कांद्याच्या आवकेत मोठी घट झाली असतानाही भावातही मोठी घसरण झाल्याने उन्हाळ कांदा उत्पादक शेतकर्यांचे धाबे दणाणले आहे.
आणखी महिनाभरात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा काढला जाणार असून सध्याची भावाची परिस्थिती पाहता सर्वच शेतकर्यांना कांदा साठवावा लागणार असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या भावात घसरण सुरुच असून काल 19 मार्च रोजी कांद्याच्या भावात आणखी 300 रुपयांनी घसरण होऊन भाव 1200 रुपयांपर्यंत आले.
शनिवारी 13 हजार 655 गोण्या कांद्याची आवक झाली. मागील बाजाराच्या तुलनेत ती जवळपास 7 हजार गोण्यांनी कमी आहे.काल एक दोन लॉटला 1100 ते 1200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठ्या कलर पत्ती कांद्याला 900 ते 1000 रुपये, भारी कांद्याला
700 ते 900 रुपये, गोल्टा कांद्याला 400 ते 700 रुपये, गोल्टी कांद्याला 200 ते 500 रुपये, जोड कांद्याला 200 ते 400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नवीन उन्हाळ कांद्याची काढणी सुरु झाली असली तरी अद्याप बाजारात उन्हाळ कांद्याची
आवक सुरु झालेली नाही.सध्याची भावाची परिस्थिती पाहता सर्वच शेतकर्यांना कांदा साठवावा लागणार असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.