Monday, May 23, 2022

नगर जिल्ह्यातील या मतदारसंघात होणार कॉंग्रेसचा आमदार ? या नेत्यांने फुंकले रणशिंग

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संपूर्ण राज्यभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने डिजिटल सभासद नोंदणी चालु आहे. या नोंदणीचा भाग म्हणून नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील

श्रीगोंदा तालुका व शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची शनिवार (दि.१९) रोजी बैठक घेऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत काँग्रेस विचार पोहोचविण्यासाठी डिजिटल सभासद नोंदणी अभियान हाती घेतले आहे. यावेळी

नागवडे यांनी पुढील आमदार काँग्रेसचाच असणार आहे, असे जाहीर केले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने उतरणार असून, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या स्वबळाच्या भाषेलामजबूत संघटनेच्या माध्यमातून उत्तर देणार आहे.

असे सूतोवाच राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.नागवडे कारखाना विजयामुळे नागवडे समर्थकांमध्ये नव्याने उत्साह संचारला आहे. या डिजिटल नोंदणीला नागवडे यांनी स्वतः लक्ष घालून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या बैठकीत एक लाख सभासद नोंदणी करण्याचे लक्ष्य ठरविले आहे. यासाठी प्रत्येक गावात एक बूथ १५० सभासद करण्याचा संकल्प करून चार कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात आली.

यावेळी नागवडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने सभासद नोंदणीसाठी योगदान देऊन आपली ताकद दाखवावी. आगामी विधानसभा

निवडणुकीचे तिकीट काँग्रेस पक्षालाच असून तालुक्यात काँग्रेसचाच आमदार होणार आहे.या बैठकीला माजी नगराध्यक्ष व काँग्रेस शहराध्यक्ष मनोहर पोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, कारखाना संचालक सुभाष शिंदे, नगरसेवक प्रशांत गोरे,

सतिश मखरे, समीर बोरा, गणेश भोस, निसार बेपारी, संतोष कोथंबिरे, प्रा. सुरेश रसाळ, डी. आर. काकडे, विश्वनाथ गिरमकर, संदीप औटी, बंडू जगताप, भाऊसाहेब बरकडे, दादासाहेब नेटके उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. धर्मनाथ काकडे यांनी केले तर आभार प्रशांत गोरे यांनी मानले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!