माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांनी जोरदार आघाडी उघडलीय. करुणा शर्मा यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता थेट कोल्हापूर उत्तर
विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. त्याबाबतची घोषणा करुणा शर्मा यांनी आज पंढरपुरातून केलीय. त्यावेळी करुणा शर्मा यांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
राजकारण कसं चालतं हे मी गेली 25 वर्षापासून पाहत आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल’, असं वक्तव्य करुणा शर्मा यांनी केलंय.
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वाद मागील काही दिवसात प्रकर्षाने पुढे आलाय. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपण परळीतून निवडणूक लढवणार असल्याचंही करुणा शर्मा यांनी यापूर्वी म्हटलंय.
मागील वर्षी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांचं मूळ नाव करुणा शर्मा असून त्या मूळ मध्यप्रदेशातील इंदूरच्या आहेत. या आरोपानंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर
धनंजय मुंडे यांनी समाजमाध्यमांवर करुणा शर्मा आणि आपले संबंध असून ही बाब कुटुंबियांनाही अवगत असल्याची कबूली दिली होती.करुणा शर्मा यांच्या निवडणुकीत उतरण्यानं ही निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच करुणा शर्मा
यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. शिवशक्ती सेना असं नवीन पक्षाचं नाव असल्याचं करुणा शर्मांनी जाहीर केलं. अनेक पक्षांनी मला प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं होतं, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
माझ्या सारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत” असा दावाही करुणा शर्मांनी केला होता.