माय महाराष्ट्र न्यूज:आज जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना राजकीय धक्का दिला आहे. बाळासाहेब मुरकुटे यांचे खंदे कार्यकर्ते व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा
तालुक्यातील हिंगोणी येथील भाजपतील युवकांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्व मान्य करत हाती शिवसेनेचे शिवबंधन बांधले.नेवासे परिसरातील युवकांनी यापूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देवून शिवसेना प्रवेश केला आहे.
जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी खरवंडी जिल्हा परिषद गट जिल्ह्यात मॉडेल गट करण्याचा संकल्प करत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. गटातील अनेक मंदिरास ‘क’ वर्गात समावेश करुन विकास कामे सुरु केली आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत हे सर्व कार्यकर्ते माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या बरोबर होते. मुरकुटे यांची कार्यपद्धत चुकीची दिशेने होत असुन मंत्री गडाख यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास कामांने
प्रभावित होवून हातात शिवबंधन बांधले आहे, असे प्रवेश केलेल्या युवकांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होत असल्याने मंत्री गडाखांची तालुक्यात पकड मजबूत होत असल्याचे बोलले जात आहे.
हिंगोणी येथील प्रशांत झिने, नवनाथ फाटके, राजेंद्र सोनवणे, नामदेव दहातोंडे, अमोल गायके, देवीदास सोनवणे, बाळासाहेब फाटके व संभाजी शिवाजी सोनवणे आदींनी भाजपच्या कार्यपद्धतीवर
नाराजी व्यक्त करत शिवसेना प्रवेश केला. अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी सर्व युवकांचा सत्कार केला.