Friday, May 20, 2022

नगर ब्रेकिंग:सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. विवाहितेने या छळाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रेखा अनिल गुंजाळ (वय 24, रा. सोनेवाडी, ता. नगर) असे

मयत विवाहितेचे नाव आहे. सोनेवाडी शिवार, मेहेकरी फाट्याजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पती, सासू, दीर यांच्यासह चौघांविरूध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस

प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयत रेखाचा भाऊ मोहन अण्णा वेठेकर (वय 30, रा. पांढरेवाडी, कोळगाव ता. श्रीगोंदे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अनिल रामकिसन गुंजाळ, अमोल रामकिसन गुंजाळ, मंगल रामकिसन

गुंजाळ व दीपक गोरख गुंजाळ (सर्व रा. सोनेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखाचा विवाह अनिल सोबत झाला होता. ती सासरी नांदत असताना आरोपींनी तिचा घरगुती खर्चासह, शेती खर्चासाठी माहेरून पैसे आणावे यासाठी छळ केला.

तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!