माय महाराष्ट्र न्यूज:शाळेत चाललेल्या सख्ख्या बहीण-भावाचा ‘पिकअप’ने समोरून दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना नगर-दौंड महामार्गावरील सोनवडी शिवारात भीमा नदीच्या पुलाजवळील
जुन्या टोलनाक्यानजीक आज, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली . अनुष्का गणेश शिंदे (वय १६) व आदित्य गणेश शिंदे (१४, रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा) अशी मृत बहीण-भावाची नावे आहेत.
या मुलांचे वडील पेंटिंगची कामे करत असल्याची माहिती असून, या गरीब कुटुंबावर संकटच कोसळले. निमगावसह परिसरावर शोककळा पसरली. सकाळी हे बहीण-भाऊ दौंड येथे शाळेत जाण्यासाठी निमगाव खलु
येथून दौंडकडे जात असताना ‘हॉटेल धनश्री’समोर जुन्या टोल नाक्याजवळ दौंडहून नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ‘पिकअप व्हॅन’ने एका टेम्पोला मागे टाकण्याच्या नादात त्यांना समोरून जोराची धडक दिली.
गंभीर जखमी झाल्याने ते मृत्युमुखी पडले. अनुष्का गणेश शिंदे वय १६,व आदित्य गणेश शिंदे वय १४ रा निमगाव खलु,ता श्रीगोंदा अशी अपघातात मृत्यू पावलेल्या बहीण भावाची नावे आहेत. या मुलांचे
वडील पेंटर काम व शेती करत असल्याची माहिती मिळाली आहे.अतिशय गरीब कुटुंबातील या सख्या बहीण भावाचा असा करून अंत झाल्यामुळे निमगावसह परिसरावर शोककळा पसरली असून या दुर्दैवी
घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.