Wednesday, May 25, 2022

अत्यंत महत्त्वाची बातमी वाचाच:1 एप्रिलपासून काय बदलणार?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सर्वसामान्यांच्या खिशाला आजपासून महागाईची झळ बसणार आहे. कारण नव्या आर्थिक वर्षात अनेक नवे बदल करण्यात आलेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या

खिशावर पडणार आहे. एकीकडे रोज पेट्रोल डिझेलचे दर वाढत असताना आजपासून औषधं आणि घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचं बजेट कोलमडणार आहे.

आता मास्क न घातल्याने दंड केला जाणार नाही. वैयक्तिक कारमध्ये मास्क घालण्याची सक्ती संपली आहे. यासोबतच मुंबईने मास्क घालण्याची अटही रद्द केली आहे. यासोबतच पश्चिम बंगालनेही मास्क घालण्यावरील बंदी हटवली आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, कोरोना विषाणूच्या संदर्भात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा 1 एप्रिलपासून संपत आहे. या अंतर्गत, कोरोनाची कॉलर-ट्यून संपली. म्हणजेच, जेव्हा

तुम्ही एखाद्याला कॉल करता तेव्हा तुम्हाला खोकल्याचा आवाज ऐकू येणार नाही आणि तो आवाज लसीकरणाचे महत्त्व सांगणारा आहे. आरोग्य मंत्रालयाने या सूचनांचे परिपत्रक सर्व दूरसंचार ऑपरेटरना पाठवले आहे.

राज्यात सीएनजी आजपासून स्वस्त झाला आहे. सीएनजीवरील व्हॅट 10.5 टक्क्यांनी कमी केल्याने सीएनजी किलोला सरासरी ७ ते ८ रुपयांनी स्वस्त होणार आहे. सीएनजीवर 13.5 टक्के मूल्यवर्धित

कर आकारण्यात येत होता. आता तो तीन टक्के आकारला जाणार आहे. मूल्यवर्धित करात कपात केल्याने सीएनजीचा दर किलोला 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होईल.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरगुती वीजग्राहकांना गोड बातमी मिळाली आहे. महावितरणचे वीजदर 2 टक्के तर टाटाचे वीज दार 4 टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर बेस्टचे वीजदर स्थिर, अदानीच्या वीज दरात वाढ होणार आहे.

आजपासून औषधांच्या किंमती वाढणार आहेत.. पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांचा यात समावेश आहे. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे.

यामुळे सुमारे 800 औषधांच्या किंमती वाढणार आहे.आजपासून रेडी रेकनरचे दर वाढलेत.. त्यामुळे घरांच्या किंमतीत वाढ होणार आहे. ग्रामीण भागात सरासरी 6.96% नगर पंचायत क्षेत्रात सरासरी 3.62% मुंबई वगळून महापालिका क्षेत्रात सरासरी 8.80% तर

मुंबई महापालिका क्षेत्रात सरासरी 2.34% वाढ करण्यात आलीये.. 2020 नंतर पहिल्यांदाच ही वाढ करण्यात आलीये.आधारशी पॅनकार्ड लिंक न केल्यास आता दंड भरावा लागणार आहे.. 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड आकारण्यात येईल..

त्यानंतर दंडाची रक्कम 1 हजार रुपये इतकी होईल.. 31 मार्च 2023 नंतर पॅन कार्ड आधारकार्ड लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होईल.आजपासून डिजिटल चलनावरही कर लागू करण्यात आलाय.. डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टोकरन्सीवर 30 % कर

आकारला जाणार आहे.. त्यामुळे एखाद्याला क्रिप्टो चलन विकून फायदा होत असेल तर त्याला कर भरावा लागणार आहे. 1 जुलैपासून विक्रीवरही 1%टीडीएस कापला जाणार आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!