माय महाराष्ट्र न्यूज:भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे मागील काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांचे घोटाळे समोर आणत आहेत. 5-6 दिवसांपूर्वीच राज्याचे परिवहन
मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी किरीट सोमय्या भरपूर आक्रमक झाले होते. हा रिसॉर्ट तोडण्यात यावा यासाठी सोमय्या नकली हातोडा घेऊन थेट दापोलीकडे रवाना झाले होते.
अशात आता सोमय्यांच्या या यादीत आणखी एका मंत्र्याचा नंबर लागला आहे.सोमय्या यांनी मुश्रीफ यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याने हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सोमय्या यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, हसन मुश्रीफ यांचं कुटुंब आणि सेनापती घोरपडे कारखाना यांच्या विरोधात भारत सरकारने पुणे न्यायालयात तक्रार
याचिका दाखल केली . फसवणूक, शेल कॉससाठी कलम 447 आणि 439 कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम 256 अन्वये कारवाईची मागणी केली आहे. लवकरच या प्रकरणावर सुनावणी होईल.
आपल्या दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी आपल्या पुणे दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. सोमय्या यांनी लिहिलं, श्री हसन मुश्रीफ, सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा कारवाईसाठी
माझा शुक्रवार 1 एप्रिल पुणे दौरा आहे. साडेचार वाजता सॅलिसबरी पार्क येथील आयकर आयुक्त इन्वेस्टीगेशन पुणे आयकर सदन येथे जाणार असून साडेपाच वाजता रजिस्ट्रार ऑफ
कंपनीस पुणे PCNTDA ग्रीन बिल्डिंग, आकुर्डी येथे दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं.