माय महाराष्ट्र न्यूज:२०२४ च्या निवडणुकांमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा लक्ष्य भाजपने ठेवले आहे. या तयारीची पहिली पायरी म्हणून भाजपने आपल्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांकडे राज्यातील
२ लोकसभा मतदारसंघाची आणि त्या मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे.या यादीवर नजर टाकल्यास राज्य भाजपचे नेतृत्व करणारे आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र
फडणवीस यांच्याकडे सोलापूर आणि अहमदनगर या मतदारसंघांची जबाबदारी आली आहे. त्यामुळे सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी आणि अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील
यांच्या मतदारसंघातीच्या बांधणीत आणि प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीत आता थेट देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार आहेत.दरम्यान फडणवीस यांनी नगरची जबाबदारी घेतल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया
देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते कमी पडतात म्हणूनच भाजपने ‘मिशन- २०२४’ अंतर्गत देवेंद्र फडणवीसांकडे
नगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. यात पवार यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरीही ही टीका म्हणजे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय घेतल्याप्रमाणे खालील नेते करणार संपूर्ण राज्यभर दौरा आणि संघटना बांधणी करणार आहेत. या दौऱ्याचं समन्वय भाजपचे संघटनमंत्री श्रीकांत भारतीय करणार आहेत.
१. देवेंद्र फडणवीस – सोलापूर, अहमदनगर २. चंद्रकांत दादा पाटील – ठाणे ग्रामीण आणि नाशिक
३. सुधीर मुंनगंटीवार – बीड, जालना, ४. पंकजा मुंडे – कोल्हापूर, सांगली
५. आशिष शेलार – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ६. श्रीकांत भारतीय – नांदेड, परभणी
७. चंद्रशेखर बावनकुळे – अकोला, अमरावती, ८. प्रविण दरेकर – पालघर मिरा भाईंदर
९. गिरीष महाजन – उस्मानाबाद, हिंगोली, १०. संजय कुटे – दक्षिण रायगड,उत्तर रायगड
११. रविंद्र चव्हाण – सातारा, पुणे ग्रामीण, १२. रावसाहेब दानवे – बुलढाणा नंदूरबार
१३. संभाजी पाटील निलंगेकर – गोंदिया, भंडारा, १४. सुधीर मुंनगंटीवार – जालना आणि बीड