Wednesday, May 25, 2022

तेवढी महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल: बाळासाहेब थोरात

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राजर्षी शाहूंच्या विचारांना विरोध करणार्‍या भाजपला तीन पक्षांनी एकत्र येऊन आम्ही सत्तेपासून दूर ठेवले आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत तुम्ही आम्हाला साथ द्या.

राजर्षींच्या विचारांना विरोध असणार्‍यांना त्यांची जागा दाखवा आणि महाविकास आघाडी भक्कम करा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केले.महाविकास

आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मिरजकर तिकटी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. चंद्रकांत जाधव यांचे अपुरे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा भाजपच्या वतीने सातत्याने प्रयत्न केला जातो. परंतु, सरकार पाडण्यासाठी जेवढे प्रयत्न करतील तेवढी महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल, असा विश्वास

व्यक्त करत थोरात म्हणाले, काँग्रेसच्या काळात महागाईच्या नावाखाली ऊठसूट रस्त्यावर उतरणारे भाजपचे कार्यकर्ते आज महागाईचा आगडोंब उसळला असताना कोठे लपून बसले आहेत? याचा

जाब मूळ गाव सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटील यांना विचारावा.महाविकास आघाडी सरकार एक-दोन महिन्यांत पडेल, असे त्यांना वाटत होते. त्यानंतर भाजपने सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

रोज एक नवीन मुहूर्त शोधू लागले. सरकार पाडण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर करून छापे टाकण्यात येत आहेत. कार्यकर्त्यांच्या कुटुंबांनादेखील त्रास दिला जात आहे. परंतु, त्यांनी काही केले तरी महाविकास आघाडीचे सरकार यापुढेही अधिक मजबुतीने काम करेल.

चंद्रकांत जाधव यांची सामान्य माणसाशी नाळ कायम राहिली. तळमळीचा कार्यकर्ता अचानकपणे आपल्यातून निघून गेला. त्यांचे राहिलेले अपूर्ण काम पुढे नेण्यासाठी जयश्री जाधव

यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. त्यांना निवडून देऊन महाविकास आघाडीचा 171 चा आकडा कायम ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. जाधव यांना बिनविरोध करून भाजपने मोठे मन दाखवावयास हवे

होते; पण त्यांनी ते दाखविले नाही. समतेचा संदेश देणार्‍या राजर्षी शाहूंचे विचार नाकारणार्‍या भाजपला कोल्हापूरची जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!