माय महाराष्ट्र न्यूज:पाटणा इथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करताना पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली. पोलीस चौकशीत या व्यक्तीने
अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपीने सांगितलं की तो स्वतःच्या पत्नीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असे. तो आपल्या पत्नीला जबरदस्तीने इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडायचा.
यासाठी तो स्वत: ग्राहकांची बुकिंग करायता. सुमारे दोन वर्षांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे सगळं सुरू असल्यातं पोलिसांनी सांगितलं. माहिती मिळताच छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.
वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीचा खुलासा ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाटणा विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील सिद्धार्थ कॉलनीतील एका अपार्टमेंट फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय चालत असे.
एखादा व्यक्ती पैशासाठी इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो, याची कल्पनाही करू शकत नाही, असं पोलिसांनी म्हटलं. वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली पकडला गेलेला आरोपी धनंजय कुमार
स्वतः आपल्या पत्नीला वेश्याव्यवसाय करायला लावायचा. तो स्वत: यासाठी बुकींग करायचा आणि त्यातून मिळणारे पैसे स्वतःकडे ठेवायचा. वेश्याव्यवसायाच्या बदल्यात मिळालेल्या पैशातून तो आपलं कुटुंब चालवत
असे, असं पोलिसांनी सांगितलं.पाटणा पोलिसांनी वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पकडलं आणि सोबतच यात अडकलेल्या महिलांचीही सुटकाही केली. ‘हिंदुस्थान’ वृत्तपत्रात
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, चौकशीदरम्यान पीडितेने सांगितलं की, ती 1 महिन्यापासून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या या व्यक्तीच्या तावडीत सापडली होती. एका महिन्यात 25 दिवस तिच्यावर अत्याचार झाले.
तिने सांगितलं की दररोज रात्री किमान दोन ग्राहक त्यांचं लैंगिक शोषण करायचे.