Wednesday, May 25, 2022

लोकल ट्रेनमध्ये महिलेला Kiss करणं व्यावसायिकाला पडलं भारी…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबईतील एका व्यावसायिकाला न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याच्यावर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

या 37 वर्षीय व्यक्तीनं मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका महिलेला किस केलं होतं. ही घटना 2015 सालची आहे.आपण हे जाणूनबुजून केले नसल्याचा युक्तिवाद दोषी व्यावसायिकाने न्यायालयात केला. उलट शेजारी

उभ्या असलेल्या व्यक्तीनं त्याला ढकललं होतं. त्यानंतर तो समोर बसलेल्या महिलेवर पडला आणि त्याच्या ओठांनी त्याच्या गालाला स्पर्श झाला होता. मात्र न्यायालयानं सर्व युक्तिवाद फेटाळून लावत शिक्षा घोषित केली आहे.

टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट व्हीपी केदार यांनी 37 वर्षीय किरण होनावरला दोषी ठरवलं आहे. मॅजिस्ट्रेट म्हणाले की, FIR मध्ये असे दिसून आलं आहे

की ट्रेनमध्ये चढल्यानंतर आरोपी महिलेसमोर बसला आणि तिच्याकडे एकटक पाहत राहिला. ते म्हणाले, महिलांमध्ये गैर आणि अशाब्दिक संकेत जाणण्याची आणि समजून घेण्याची जन्मजात क्षमता असते, तसेच लहान

तपशीलांकडे लक्ष असते. त्यामुळे महिलेने हे आरोप अजाणतेपणी केले आहेत, असे म्हणता येणार नाही.महिला आणि तिचे मित्र साक्षीदार असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या संदर्भात दोघांनीही साक्ष दिली होती.

याशिवाय आणखी दोन जणांनीही साक्ष दिली. त्यावेळी महिलेने आरडाओरड केला तेव्हा सहप्रवाशांनी आरोपीला मारहाण केल्याचं त्यांनी पाहिलं होतं. न्यायालयाने म्हटले, आरोपीनी महिलेच्या

उजव्या गालाचं किस घेतलं होतं याचं प्रत्यक्ष, ठोस आणि सकारात्मक पुराव्यांवरून सिद्ध झालं आहे.न्यायालयानं व्यावसायिकाला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जर वसुली झाली तर महिलेला

नुकसानभरपाई म्हणून 5 हजार रुपये द्यावे लागतील, असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात कमाल शिक्षा पाच वर्षांची असली तरी न्यायालयाने केवळ एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपीविरुद्ध गुन्हेगारी इतिहासाचे कोणतेही पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!