माय महाराष्ट्र न्यूज:आपल्या बेधडक आणि बिनधास्त वक्तव्याबद्दल ओळखले जाणारे नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आणखी एक असंच वक्तव्य केलं आहे. ‘ज्या पक्षात
आम्हाला न्याय मिळतो, त्या पक्षात आम्ही जातो. आणि आमच्यावर अन्याय झाला तर लगेच पलटी मारतो,’ असं विखे पाटील म्हणाले.श्रींगोदा तालुक्यातील एका सहकार सोसायटीच्या कार्यक्रमात विखे
पाटील बोलत होते. यावेळी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. सोसायटीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असल्यानं त्याच्याशी संबंधित हे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यावेळी विखे पाटील यांनी आपल्या शैलीत टोलेबाजी केली.
विखे यांच्या पक्षांतराची नेहमी चर्चा होत असते. त्यामुळं जेव्हा संधी मिळेल, त्यावेळी ते याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतात. श्रीगोंदा येथील कार्यक्रमात ही संधी त्यांनी साधली. ते म्हणाले, ‘ज्या पक्षाकडून
न्याय मिळण्याची आशा वाटते, त्या पक्षात आम्ही जातो. मात्र, तेथे अन्याय झाला तर आम्ही लगेच पलटी मारतो,’ असं सांगत त्यांनी राजकीय पक्षांबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली.अलीकडेच खासदार विखे
पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षविरहीत ‘जिल्हा विकास आघाडी’ या आपल्या आजोबांच्या जुन्या प्रयोगासंबंधी भाष्य केलं आहे. जिल्ह्यात हा प्रयोग पुन्हा राबविण्याचे संकेत
त्यांनी दिले आहेत. महाविकास आघाडीला रोखण्यासाठी पक्षीय विचार बाजूला ठेवून सर्वच पक्षातील आपली माणसं जोडण्याचा हा प्रयोग आपण वरिष्ठांच्या परवानगीनं करणार असल्याचं खासदार विखे पाटील यांन पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं.
त्यावेळी भाजपचे श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी घनश्याम शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार,
बाळासाहेब नहाटा, भाजपच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा पाचपुते असे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.