माय महाराष्ट्र न्यूज:राहुल कोळसे:नेवासा तालुक्यातील श्री देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून हभप श्री कृष्णा महाराज मते यांचा शुक्रवारी दि.६ मे रोजी पंचसंस्कार दीक्षा विधी
सोहळा होणार असल्याची माहिती श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिर देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य हभप भास्करगिरीजी महाराज यांनी दिली.भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने
सर्व संत महंतांच्या उपस्थितीत सनातन वैदिक हिंदू धर्म रीतिरिवाजाप्रमाणे श्री क्षेत्र देवगड श्री दत्त मंदिर संस्थान येथील गुरू परंपरेनुसार श्री कृष्णा महाराज मते यांचा उत्तराधिकारी पंच
संस्कार दीक्षा सोहळयाच्या निमित्ताने शुक्रवारी दि.६ मे रोजी सकाळी ८ ते ११ यज्ञ मंडपामध्ये होमहवनादी नामकरण विधी कार्यक्रम होईल सकाळी ९ ते ११ सावखेडा येथील गिरी आश्रमाचे प्रमुख महंत कैलासगिरी महाराज
यांचे कीर्तन होईल.सकाळी ११ ते ११.३० यावेळेत विशिष्ट पुज्यनिय संतांचे व मान्यवरांचे शुभ संदेश व ब्रम्हवृंदाचा शांतीपाठ श्रींची आरती होऊन महाप्रसाद वाटपाने पंच संस्कार दीक्षा विधी सोहळयाची सांगता होईल
सदरचा पंच संस्कार दीक्षा सोहळा श्री श्री श्री १००८ धर्मनिष्ठ राजगुरू दत्तात्रेयरत्न अनंत विभूषित परिव्रजकाचार्य महामंडलेश्वर महाराष्ट्र पिठाधिश्वर महान तपस्वी शिवानंदगिरीजी महाराज श्री क्षेत्र मंजूर ता.कोपरगांव यांच्या मार्गदर्शनाखाली
व महंत देवेंद्रगिरीजी महाराज गुजरात,श्री महंत वेदव्यास पुरीजी महाराज गुजरात,महंत इंद्रजित भारतीजी महाराज अध्यक्ष गिरनार मंडल गुजरात,श्री महंत सेक्रेटरी नारायणगिरीजी महाराज, गाजियाबाद उ.प्र. व गुरूदास श्री भास्करगिरीजी महाराज तसेच
परिसरातील सर्व संत महंत उपस्थित रहाणार आहे.पंच संस्कार दीक्षा सोहळयाच्या निमीत्ताने दिक्षीत व्यक्तीचा प्रथम खौर कर्म,अग्निहवन,पवित्र जलाभिषेक, पंचगुरू संस्कार विधी आदी संस्कार यथा विधी भेंडे येथील
वेदशास्त्रसंपन्न पंडीत गणेश गुरू कुलकर्णी यांच्या पौराहित्याखाली वेदवाणीने होणार आहे. पंचसंस्कार दीक्षा सोहळयाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळयाचा
आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.