माय महाराष्ट्र न्यूज :क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण, श्रीगोंदा या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मा.श्री. आप्पासाहेब सोनवणे, मा.महेश भोर पा., मा.सौ. सीमा गोरे, मा.सौ. प्रतिभा गांधी, मा. सौ. भारती इंगवले, मा. महेश कांबळे, मा. श्री. एम डी शिंदे, मा. श्री. सुधीर भाऊ खेडकर, मयुर बनसुडे,
महेश बोरुडे आदींसह श्री स्वयंभू चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी डॉ. नितीन खामकर तालुका आरोग्य अधिकारी श्रीगोंदा, सौ. शुभांगीताई मनोहरदादा पोटे नगराध्यक्ष श्रीगोंदा नगरपरिषद, श्री. बाळासाहेब काकडे, मा. श्री.राजू दादा गोरे, मा. सौ. राजश्रीताई शिंदे,मा.श्री. सौरभ राऊत आदींची मनोगत पर भाषणे झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता परिषद तालुकाध्यक्ष मा. श्री. राजूदादा गोरे हे होते तर या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. जयराज गोरे व सूत्रसंचालन श्रीगोंदा प्रेस क्लबचे अध्यक्ष मा. श्री. विशाल चव्हाण यांनी केले.
या शिबिरात तब्बल ६१ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले, यासाठी श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण, श्रीगोंदा ने परिश्रम घेतले व त्याचे चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.