भेंडा:नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री क्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे आज शनिवारी मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.
आज शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कारखान्याचे सेक्रेटरी रविंद्र मोटे, कारखान्याचे संचालक अशोक मिसाळ , डॉ रविंद्र आढाव,
योगेश लोळगे यांच्या हस्ते व गणेश गुरु कुलकर्णी यांच्या मंत्रपुष्पांजलींने श्रींना गंगाजल अभिषेक करून फटाक्यांची व तोफांची आतषबाजी करत आरती करण्यात आली.
सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.गेल्या दोन वर्षापासून कोरोना या साधीच्या आजारांने उत्सव साजरा करण्यात आला नव्हता परंतु निर्बंध कमी झाल्यानंतर या वर्षी सोहळा साजरा
करण्यात आला.मोठ्या भक्तीम्य वातावरण मध्ये तीन दिवसीय धार्मिक विधी व कार्यक्रम संपन्न झाले.आज सकाळी हे.भ.प.उद्धव महाराज सबलस आळंदी यांच्या काल्याच्या किर्तन पार पडले व सायंकाळी सहा वाजता भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात
आली आणि संध्याकाळी सात वाजता आरती करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.काल सायंकाळी देवगड संस्थानाचे मंहत गुरूवर्य भास्करगिरीजी महाराज व ज्ञानेश्वर देवस्थानचे ह.भ.प शिवाजी महाराज देशमुख यांनी भेट दिली. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंहत सुनिल गिरी महाराज यांच्या शुभहस्ते धर्म ध्वजारोहण सोहळा पार पडला होता.
तर आज माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम मिसाळ,प्रविण गडाख, काशिनाथ नवले, नेवासा बाजार समितीचे सभापती शिवाजीराव शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, गणेश गव्हाणे,माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, अशोक वायकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी आदींनी दर्शन घेतले.
या सोहळ्यासाठी श्रीराम सेवक बापूसाहेब नजन ,वाल्मिक लिंगायत, सुनिल देशमुख कल्याण मडके, विश्वास कोकणे, पत्रकार राहुल कोळसे, अर्जुन शिंदे, संभाजी मिसाळ,चांगदेव जगताप, किशोर मिसाळ,केशव पंडीत,बंडू अंदुरे, संतोष मिसाळ,
योगेश मिसाळ, समाधान शेलार,शरद मिसाळ,तात्या फुलमाळी,सराजी मिसाळ, आकाश मिसाळ, रमेश आरणे, डॉ राहुल मिसाळ,सुभाष फुलमाळी,राहुल शिंदे आदींनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.