माय महाराष्ट्र न्यूज:सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करणं फायद्याचं असते. त्यामुळे स्त्री असो वा पुरुष, दोघांनाही दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
आठवड्यातून 3 ते 4 वेळा व्यायाम केल्याने लैंगिक तंत्र, लवचिकता आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते. काही इतर अभ्यासही सुचवतात की, व्यायाम केल्याने पुरुषांचे लैंगिक आरोग्य सुधारू शकते. तुम्हालाही तुमचे लैंगिक आरोग्य सुधारायचे असेल, तर तुम्ही खालील विशेष व्यायाम करू शकता.
1)वजन उचलणे -वेट लिफ्टिंगमुळे पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन तयार होते. त्यामुळे पुरुषांमध्ये लैंगिक क्षमता वाढते. मॅकॉलच्या मते, ठराविक वजन 10 वेळा उचलल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवू लागेल, इतके वजन उचलायला हवं.
त्याच वेळी, काही इतर अभ्यासांमध्ये देखील कमी-अधिक वजन उचलल्यामुळे टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आले आहे.तुम्हाला लैंगिक जीवन चांगले बनवायचे असल्यास तुम्ही पुश-अप, सिट-अप आणि क्रंच व्यायाम देखील करू शकता.
तसेच स्नायूंच्या वाढीसाठी खांदे, छाती, पाय आणि अॅब्ज (Abs) व्यायाम करू शकता. त्यामुळे स्नायूंची वाढ होईल आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी देखील वाढेल.
2. केगेल्स (Kegels)-केगेल्स हा पुरुषांसाठी उत्तम सेक्स एक्सरसाइज मानला जातो. याचे कारण असे की, हा व्यायाम प्युबोकोकल (PC) स्नायूंना टोनिंग करतो. लॉस एंजेलिसचे फिजिशियन अरनॉल्ड केगेल यांच्या नावावरून या व्यायामाला केगेल्स म्हटलं जाते. हा व्यायाम पेल्विक फ्लोर स्नायूंना बळकट करतो, जे लैंगिक क्षमता सुधारण्यास मदत करते.
3. योग (Yoga)-योगा केल्याने शरीराची लवचिकता वाढते, ज्यामुळे तुम्ही नवीन सेक्स पोझिशनसह तुमच्या सेक्स लाईफमध्ये बदल करू शकता. योगाभ्यास करून तुम्ही वेगवेगळ्या सेक्स पोझिशन्सचा
प्रयत्न करू शकाल, ज्यामुळे लैंगिक संबंधाचा वेळ वाढेल आणि लैंगिक जीवनही सुधारेल. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, योगामुळे ऊर्जा आणि स्टॅमिना वाढण्यासही मदत होते.4. जलद चालणे (Fast Walking)-हार्वर्डच्या संशोधकांनी 50 वर्षांपेक्षा
जास्त वयाच्या 31,000 पुरुषांवर केलेल्या अभ्यासानुसार, एरोबिक व्यायामामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका 30 टक्के कमी होतो. त्याच वेळी, दुसऱ्या अभ्यासानुसार, दररोज किमान 200 कॅलरीज बर्न करणारी एरोबिक
क्रियादेखील इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका कमी करू शकते. तज्ज्ञांच्या मते, वेगाने चालण्याने रक्ताभिसरण आणि रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे वेगाने चालणे, धावणे आणि इतर एरोबिक क्रिया लैंगिक आरोग्य वाढवू शकतात.
5. पोहणे (Swimming)-हार्वर्डने 160 पुरुष आणि महिला जलतरणपटूंवर केलेल्या अभ्यासानुसार, जलतरणपटूंचे लैंगिक आरोग्य न पोहणार्यांपेक्षा चांगले असते. मॅकॉल म्हणतात, आठवड्यातून किमान 3 वेळा 30 मिनिटे पोहल्याने लैंगिक आरोग्यावर चांगला
प्रभाव पडतो.वजन कमी करण्यासाठीदेखील पोहणे एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे सेक्स लाईफवर चांगला परिणाम होतो. इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या 110 लठ्ठ पुरुषांवर केलेल्या अभ्यासानुसार त्यांनी केवळ 10 टक्के वजन कमी केल्याने त्यांचे लैंगिक जीवन 1/3 टक्क्यांनी सुधारले.