Monday, May 23, 2022

बैलगाडा शर्यतीसाठी नियमावली जाहीर ; या गोष्टीला मनाई, अंतराची अट

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंधरा दिवस अगोदर परवानगी घेणे. अनामत रक्कम, बैलाची शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र, शर्यतीसाठी बैलांची छळातून मुक्तता, बैलांना उत्तेजक द्रव्य-मद्याचा

वापर न करणे आदी स्वरूपाची नियमावली बैलगाडा र्शयतीसाठी शासनाने लागू केली आहे.सर्वोच्च न्यायालय आणि शासनानाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे.

बैलगाडी शर्यतीच्या वेळी बैलांना अमानुष वागणूक देण्याच्या विरोधात काही प्राणिमित्र संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील बैलगाडी

शर्यतीवरील बंदी मागे घेतली आहे. सध्या सर्वत्र यात्रा जत्रांमध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्याची चढाओढ लागली आहे. या शर्यतीत दरम्यान सुरक्षिततेची योग्य उपाययोजना करण्यात येत

नसल्याने अनेक अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शर्यतीसाठी शासनाकडून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय यांच्याकडील अधिसूचनेनुसार

आयोजकांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार यापुढील काळात बैलगाडी शर्यतीचे आयोजन संयोजकांना करावे लागणार असल्याची माहिती साताऱ्याचे प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी रिचर्ड यानथन यांनी दिली.

नियमावली

* बैलाच्या वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र आवश्यक

* स्पर्धेतील सहभागी बैलाचे छायाचित्र

* ठरलेल्या गाडीवानास ओळखपत्र

* ठरलेल्या गाडीवानालाच सहभागी होण्याची परवानगी

* शर्यतीसाठी फक्त एक हजार मीटर अंतराची अट

* शर्यतीसाठी योग्य धावपट्टी आवश्यक

* बैलावर काठी, चाबूक अशा कुठल्याही प्रकारच्या वस्तूचा वापर करण्यावर मनाई

* बैलांना कोणतेही उत्तेजक औषधी वा मादक द्रव्य देण्यास मनाई

* स्पर्धेवेळी पशु रुग्णवाहिका असणे आवश्यक

* शर्यतीचे चित्रीकरण करून उप विभागीय अधिकाऱ्यास सादर करणे बंधनकारक

* वरील कोणत्याही शर्तीचा भंग झाल्यास अनामत रक्कम जप्तीसह कारवाई

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!