Wednesday, May 25, 2022

या कारणाने मंत्री गडाखांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार ? इतक्या लोकांच्या टोळक्याने केला हल्ला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार झाल्याने

एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव जवळ ही घटना घडली आहे.

या हल्ल्यात राजळे यांना गोळी लागली आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहमदनगरच्या मॅक्सकेअर रूग्णालयात राहुल राजळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

मंत्र्याच्या पिएवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे हे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आपल्या गाडीने घारकडे निघाले होते.

घोडेगाव परिसरात ते येताच त्यांच्यावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. गोळीबार करत राहुल राजळे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.मध्यरात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती

सुधारत असल्याचे त्यांचे बंधू विकास राजळे यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक

सचिन बागुल यांनी रात्रीच परिसरातील सर्व रस्त्यावर नाकेबंदी करुन आरोपीचा शोध सुरु केला. विकास जनार्धन राजळे यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयित आरोपीचे नावे टाकण्यात आले असून सर्व

आरोपी घोडेगाव (ता.नेवासे) येथील असल्याचे समजते.राजळे लोहगाव येथील आपल्या घराजवळ येताच पाळत ठेवून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. सुमारे पाच

गोळ्या आरोपींनी झाडल्या. त्यातील एक राजळे यांच्या पोटात तर दुसरी डाव्या पायाला लागली आहे. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!