माय महाराष्ट्र न्यूज:दिवसेंदिवस महाराष्ट्रातील तापमानात वाढ होत आहे. मात्र, गेल्या 24 तासांत,कोकण व अंतर्गत भागात काही ठिकाणी गडगडाटी वादळी पाऊस व तुरळक ठिकाणी गारपीट झाली.
यामुळे उन्हाच्या तडाख्या दरम्यान नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला आहे.गेल्या 24 तासांत,कोकण व अंतर्गत भागात काही ठिकाणी गडगडाटी वादळी पाऊस व तुरळक ठिकाणी गारपीट झाली.
तर पुढील 2 दिवस राज्यातील काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
मात्र, याबरोबरच दिवस 3 ते 5 दर्शविल्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत
याबाबत माहिती दिली. तर कालच्या पावसाने पुणे भागात किमान तापमानात अंशता घट झाली आहे.उष्णतेचा हा वाढता पार अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. त्यातच राज्यातील काही भागांत
अवकाळी पाऊसही पडत आहे. कधी कडाक्याचं उन तर कधी अवकाळी पाऊस या विचित्र परिस्थितीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान आता हवामान विभागाने
पुढील 2 दिवस राज्यातील काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.