Monday, May 23, 2022

तुम्हालाही WhatsApp वर असा मेसेज आला असेल तर सावधान

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंटरनेटच्या या जगात सायबर गुन्हेगार अनेक लोकांना आपले लक्ष्य करतात. मात्र, आता त्यांची हिंमत इतकी झाली आहे की ते थेट

उपराष्ट्रपतींच्या नावाचा वापर करुन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वत:ला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू असे सांगून एक व्यक्ती देशातील व्हीआयपींसोबत अनेक

जणांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत आहे आणि आर्थिक मदतीची मागणी करत आहे. उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाने याबाबत शनिवारी ही माहिती दिली.उपराष्ट्रपतींच्या सचिवालयाने अधिकृत निवेदनात

लोकांना सावध केले आहे की, ही व्यक्ती 9439073183 या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅप संदेश पाठवत आहे. तसेच याप्रकारचे बनावट संदेश आणखी इतरही क्रमांकावरुन येऊ शकतात, अशी शक्यता

असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. या व्यक्तीने अनेक व्हीआयपी लोकांना अशाप्रकारे उपराष्ट्रपींच्या नावाने मेसेज पाठवून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. ही बाब उपराष्ट्रपतींच्या

निदर्शनास आणून दिल्यानंतर उपराष्ट्रपती सचिवालयाने गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे.याआधी बंगळरु येथील सुकेश चंद्रशेखर यांने अनेक मोठ्या शहरातील श्रीमंत लोकांना फसवले होते.

चंद्रशेखरला बालाजीच्या नावानेही ओळखले जाते. त्याने नोकरी देण्याच्या नावावर अनेक लोकांची फसवणूक केली. स्वत:ला राजनेत्याचा नातेवाईक सांगून त्याने 100 हून अधिक लोकांपासून 75 कोटी रुपये उकळले होते.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!