Tuesday, May 24, 2022

नगर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांची जबरदस्त यश एक एकरात तब्बल 25 टन कांदा पिकवला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे शेतीतील उत्पादन कमी होत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. पण अशातच अहमदनगर जिल्ह्यातील बाबासाहेब गोरे या शेतकऱ्याने केलेल्या

एका यशस्वी प्रयोगातून एका एकरामध्ये तब्बल 25 टन कांद्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या प्रयोगाची राहुरी कृषी विद्यापीठाने देखील दखल घेतली असून या तंत्रज्ञानाचा फायदा

इतर शेतकऱ्यांना होण्यासाठी प्रचार आणि प्रसार सुद्धा आता विद्यापीठाच्या मार्फत केला जाणार आहे.शेती जर फायद्याची करायची असेल तर शेतीची उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे आहे. राज्यातील लाखो

शेतकरी कांद्याचे उत्पादन घेत असतात. जर एकरी कांद्याच्या उत्पादनाचा विचार केल्यास सरासरी 12 ते 15 टन कांदा निघतो. मात्र जर नियोजनबद्ध शेती आणी तंत्रज्ञानाची जोड दिली तर उत्पादन दुप्पट वाढू शकते

हे सिद्ध झालं आहे. राहाता तालुक्यातील राजुरी गावातील प्रयोगशील शेतकरी बाबसाहेब गोरे यांनी एक एकर शेतीत जवळपास अडीच लाख कांद्याची रोपं लावली त्यात पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून

एकरी 25 टन कांद्याचे उत्पादन घेतले आहे. कांदा पीक लावण्या आधी शेत जमिनीची देखभाल सुद्धा गोरे यांनी केली असून राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पी. जी. पाटील यांच्या उपस्थितीत हा शेतीतील

कांदा काढण्यात आला आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान आता इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कुलगुरूंनी सांगितलं आहे.बाबासाहेब गोरे

गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. डाळींबासाठी त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना डाळींबरत्न नावाने देखील ओळखलं जातं. वडिलांनी परंपरागत शेती केली मात्र शेती नफ्याची

कशी करावी आणि इतर शेतकरी सुद्धा कसे सधन होतील यासाठी काम करत असल्याचं बाबासाहेब गोरे यांनी सांगताना कांदा पीक लागवडीची माहिती देखील दिली.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!