माय महाराष्ट्र न्यूज: मनुष्य म्हटला की पोटाची खळगी भरण्यासाठी काही लोक या गावातून त्या गावात तर काही या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पण तरीही काही ना रोजगार मिळत नाही
मग शेवटी या राज्यातून दुसऱ्या राज्यात येऊन रोजगार करून स्वतःची उदाहरणे चालवण्याचा प्रयत्न काही कुटुंब करतात आणि असेच एक कुटुंब राजस्थान सोडून
अहमदनगर जिल्ह्यात आले आणि काम करू लागली पण काळ आला आणि सर्वकाही ही घेऊन गेला.नगर जिल्ह्यातून एक अतिशय दुःखद घटना समोर आलेली आहे या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ व्यक्त होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील मुर्षंतपुर शिवारात विहिरीचे खोदकाम सुरु असताना क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने मोठा अपघात होऊन त्यात दोन जण ठार झाले आहे.
या अपघातात राजस्थान येथील जेठालाल जग्गुलाल भिल (वय अंदाजे 34 वर्ष) व त्यांची पत्नी शांती जेठालाल भिल (वय अंदाजे 30 वर्ष) या पती
पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.