माय महाराष्ट्र न्यूज:दोन दिवसांपूर्वी घारगावच्या आखाड्यात मैदान गाजवलेल्या खैरदरा येथील युवा पहिलवानाने, दारुच्या धुंदीत घरात झोपलेल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या तोंडात
ओढणीचा बोळा कोंबून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी झिंगलेल्या पहिलवानाची यथेच्छ धुलाई केल्याने त्याला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात
दाखल करण्यात आले आहे. ही घटना तालुक्याच्या पठार भागातील एका गावात शनिवार (दि. 23) रोजी पहाटे घडली.या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पहिलवान नवनाथ आनंदा चव्हाण (वय 40, रा. खैरदरा,
कोठे बुद्रूक, ता. संगमनेर) याच्यावर बलात्कारासह पोक्सो आणि अॅट्रोसीटीअंतर्गत तर जखमी पहिलवानाच्या फिर्यादीवरुन पीडितेच्या आईसह सात जणांवर लाठ्या-काठ्यांसह मारहाण करीत गंभीर जखमी
केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पठारातील एका दुर्गम गावातील पिडीत मुलगी रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपली होती.
तर तिची आई घराबाहेर दारातच झोपी गेली होती. पहाटेच्यावेळी आरोपी नवनाथ चव्हाण याने दारुच्या नशेत अनाधिकाराने घरात प्रवेश करून, दरवाजा बंद करुन झोपलेल्या मुलीवर अत्याचार केला.
मुलीच्या ओरडण्याने जाग आलेल्या आईने शेजार्यांना हा प्रकार सांगितल्या संतप्त जमावाने लाकडी दांडके व लाथा बुक्क्यांनी पहिलवानाची यथेच्छ धुलाई केली व त्याचे पाय बांधून त्याला उसाच्या शेतात नेवून टाकले.
शनिवारी सकाळी हा प्रकार पाहिल्यावर त्याला आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरुन आरोपी चव्हाण विरोधात भारतीय दंड संहिता कलम 376 (2) सह
बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 4 व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक
कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने करत आहे.