‘
माय महाराष्ट्र न्यूज:एका जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तीच्या प्रसिद्धीनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. कारण, ना मोठा चित्रपट ना कलाजगतात फारसं काम; पण तरीही ही इतकी प्रसिद्ध कशी ? हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करत होता.
ही सेलिब्रिटी म्हणजे किम कार्दशियन. किम प्रकाशझोतात आली काय आणि अब्जोंच्या संपत्तीची मालकीण झाली काय. हे सर्व निव्वळ अविश्वसनीय.
कार्दशियन आणि जेनर ही दोन्ही कुटुंब ही त्यांच्याभोवती असणाऱ्या वादग्रस्त गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असतात. किमसोबतही असंच काहीसं घडलं, जे जाणून तुम्हाला हादराच बसेल.
2007 मध्ये किमची एक सेक्स टेप व्हायरल झाली होती. त्यावेळी या व्हिडीओची बरीच चर्चा झाली. किंबहुना आताही ही चर्चा अधुनमधून सुरुच असते. ही तिच सेक्स टेप होती, ज्यामुळं किमच्या नावाभोवती हे प्रसिद्धीचं वलय तयार झालं.
ही सेक्स टेप बाहेर आलीच कशी, हाच प्रश्न राहून राहून विचारला गेला. पण, यातही मोठी बाब आहे. की, किमच्या आईनं म्हणजेच क्रिस जेनर यांनीच त्यांच्या मुलीची सेक्स टेप व्हायरल केली.
प्रसिद्धीपोटी क्रिस यांनी किमची ही टेप सर्वांसमोर आणली असं म्हटलं जातं. Ian Halperin च्या ‘Kardashian Dynasty’मध्ये यासंदर्भातला उल्लेख आढळतो. जिथं किमनं विविड एन्टरटेन्मेंटशी एक करार केल्याचं म्हटलं गेलं.
त्यावेळचा प्रियकर रे जे याच्याशी बनवलेली सेक्स टेप लीक करण्याचा हाच तो करार. हाल्परिननं एका (निनावी) इसमाशी बोलताना यासंदर्भातचं गुपित उघड केलं. ‘किम आणि पॅरिस हिल्टन या दोघांच्याही जवळच्या व्यक्तीनं तिला प्रसिद्ध व्हायचं असल्यास सेक्स टेप हा उत्तम पर्याय असू शकतो’, असं सांगितलं.
मिळालेल्या या सल्ल्यानंतर किमनं यासंबंधीची चर्चा तिच्या कुटुंबाशी केली. इतकंच नव्हे तर किमच्या आईनंच यासंबंधीचा सर्व व्यवहार पाहत लेकिचीच सेक्स टेप जगासमोर आणली होती.
किम आणि रे ची 39 मिनिटांची सेक्स टेप त्यावेळी £18 million रुपयांना खरेदी करण्यात आली होती. हॉटेलमधील एका रुममध्ये त्यांच्यात आलेले संबंध या टेपमुलं जगासमोर आले होते.