Monday, May 23, 2022

मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर हल्ला करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला याठिकाणाहून अटक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबारातील मास्टरमाईंड समजला जाणाऱ्या ऋषिकेश वसंत शेटे या

आरोपीला आज स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने हनुमानवाडी (ता. नेवासे) येथून अटक केली. गडाखांच्या कार्यकर्त्यांनी या कारवाई बद्दल पोलिस यंत्रणेचे जोरदार स्वागत केले.

मंत्री गडाखांचे सोनई येथील कामकाज आटोपून स्वीय सहाय्यक राजळे आपल्या घरी चालले असताना लोहगाव शिवारात तीन ते पाच जणाने पिस्तुलातून पाच गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

यातील एक गोळी राजळे यांना लागली होती. विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज शुक्रवारी पहाटे शेटे यास त्याच्या राहत्या घरापासून जवळ अटक करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे व पथकाने ही कारवाई केली. शेटे यास अटक झाल्याचे समजताच सोनई परिसरात

समाधान व्यक्त करण्यात आले. तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक विजय करे यांनी आरोपीची कसून चौकशी केली. चार पैकी तीन आरोपीस अटक

झाली असून बबलू लोंढे हा अजूनही फरार आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!