Friday, May 20, 2022

तुम्ही कोरोनाची ही लस घेतली का तर तुमच्यासाठी मोठी बातमी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सरकार लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करत आहे.

विशेषत: राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या समितीने शिफारस केली आहे. NTAGI च्या

स्थायी तांत्रिक उपसमितीची शुक्रवारी बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा लाखांहून अधिक लोकांना रशियन लस मिळाली आहे.ज्या लोकांनी रशियाच्या अँटी-कोविड

लस स्पुटनिक-व्हीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना या लसीचा पहिला डोस बूस्टर म्हणून दिला जाऊ शकतो. स्पुटनिक-व्ही लसीच्या दोन डोसच्या रचना भिन्न आहेत. रशियन लस घेतलेल्या

लोकांसाठी बूस्टर डोस देण्याबाबत सध्या कोणताही धोरणात्मक निर्णय नाही. Co-Win पोर्टल Sputnik-Vसाठी कोणताही बूस्टर डोस पर्याय प्रदर्शित करत नाही. ज्या लोकांनी गेल्या वर्षी

जुलैमध्ये स्पुतनिक-व्ही लसीचा दुसरा डोस घेतला त्यांना बूस्टर डोस मिळू शकला नाही.देशातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. अनेक बड्या आरोग्य तज्ज्ञांनी कोरोना

मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्याचा आग्रह धरला आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.

तरीही लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. वृत्तसंस्था ANI नुसार, दिल्लीतील अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर निखिल मोदी यांनी सांगितलं की, गेल्या 10 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे.

डॉ. मोदी म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डायरियासारख्या पोटाशी संबंधित समस्या देखील पहिल्यांदाच दिसून येत आहेत. गेल्या 10 दिवसांत डायरियासारख्या

आजाराशी संबंधित अनेक कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. मात्र, त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. ज्या लोकांना आधीच आरोग्याशी संबंधित आजार आहेत त्यांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!