माय महाराष्ट्र न्यूज:हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयाचं खूप महत्त्व असते. हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी सोन्याची काहीतरी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र त्यासोबतच अक्षय्य
तृतीयाच्या दिवशी काहीतरी नवीन वस्तू खरेदी करणे आणि त्यानंतर मंगल कार्यांचं आयोजन करणं देखील खूप शुभ असतं. दिवाळीप्रमाणेच अक्षय्य तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यानं घरात
धन धान्याची भरभराट होते तसंच आरोग्य देखील चांगलं राहतं. अक्षय्य तृतीयाच्या निमित्तानं तुम्हांला काही उपाय सांगणार आहोत. जे केल्यानं तुमच्या घरात लक्ष्मी नेहमीच विराजमान राहिल आणि तुम्हांला
कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या उद्भवणार नाही. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी करा हे उपाय अक्षय्य तृतीयाच्या दिवशी वापरा ये उपाय, आर्थिक तंगी होईल दूर तसं बघायला गेलं तर अक्षय्य
तृतीयाच्या दिवशी सोन्याची काहींना काही वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र या दिवशी सोन्याची लक्ष्मीची पावलं खरेदी करून घरी आणावी आणि त्याची विधीवत पूजा करावी. यामुळे तुमच्या
घरात पैशाची कधीच कमतरता भासणार नाही. असं मानलं जातं की, कवड्याची उत्पत्ती समुद्र मंथनातून होते. जे लक्ष्मी देवीला खूप पसंत आहे. अक्षय्य तृतीयाच्या दिवशी अकरा कव़ड्या लाल कपड्यात बांधून
देवीच्या पायथ्याशी ठेवावे. त्यामुळे लक्ष्मी देवीची कृपा नेहमी तुमच्यावर असेल. अक्षय्य तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीची पुजा करताना डोक्यावर केसर आणि हळदीचा टिळा लावावा. असं केल्यानं लक्ष्मी देवीचा
सहवास नेहमीच तुमच्या घरात राहतो. तसं बघायला गेल्यास सर्व प्रकारची पुजा करताना नारळ ठेवणं शुभ मानलं जातं. मात्र अक्षय्य तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीच्या पावलांवर नारळ ठेवल्यास देवी प्रसन्न होते.
अक्षय्य तृतीयाच्या दिवशी साखर, खरबूज, तीळ, तूप, वस्त्र, चांदी, मीठ यांसह अन्य वस्तू ब्राम्हणांना दान केल्यास मन शांत राहतं आणि पैशाची चिंता सतावत नाही.